गडचिरोलीविदर्भ

प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू गडचिरोली दौऱ्यावर

शेतकरी, दिव्यांग आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी ‘संघर्ष यात्रा’

गडचिरोली : प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू २४ सप्टेंबर रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. शेतकरी कर्जमाफी, निराधार, दिव्यांग, मजूर, मच्छीमार आणि इतर सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी त्यांची ‘संघर्ष यात्रा’ गडचिरोली शहर, आरमोरी आणि देसाईगंज तालुक्यांमध्ये पोहोचणार आहे.

बच्चू कडू यांची संघर्ष यात्रा सकाळी ११ वाजता चंद्रपूरहून गडचिरोलीजवळील पारडी येथे पोहोचेल. त्यानंतर ती आरमोरी तालुक्यातील डोंगरगाव आणि देसाईगंज तालुक्यातील कुरूड येथे जाईल. दुपारी १ वाजता: आरमोरीतील साई दामोधर मंगल कार्यालयात आगमन. दुपारी २.३० वाजता: याच ठिकाणी दिव्यांग मेळाव्याचे आयोजन. सायंकाळी: कुरूड येथे मारुती मंदिर आणि झुरे मोहल्ला येथे भेट. सायंकाळी ७ वाजता: आरमोरीच्या इंदिरा गांधी चौक आणि टिळक चौकातील देवीचे दर्शन घेऊन ते रवाना होतील.

या दौऱ्यात मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रहार जनशक्ती पक्षाने केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button