गडचिरोलीमनोरंजनविदर्भ

गडचिरोलीत उत्साहात पार पडला भव्य तान्हा पोळा उत्सव; राजविर साळवे प्रथम, डिम्पल तरारे द्वितीय तर अद्वय नैताम तृतीय

A grand Tanha Pola festival was held in Gadchiroli with enthusiasm; Rajvir Salve came first, Dimple Tarare came second and Advay Naitam came third

गडचिरोलीत उत्साहात पार पडला भव्य तान्हा पोळा उत्सव; राजविर साळवे प्रथम, डिम्पल तरारे द्वितीय तर अद्वय नैताम तृतीय

गडचिरोली: जय हिंद दुर्गा उत्सव मंडळ, गडचिरोलीच्या वतीने महात्मा गांधी चौक येथे भव्य तान्हा पोळा उत्सव अत्यंत उत्साहात आणि पारंपरिक वातावरणात पार पडला. या प्रसंगी आयोजित नंदीबैल सजावट व वेशभूषा स्पर्धेत बालगोपालांनी आकर्षक सजावट आणि सामाजिक संदेशांच्या माध्यमातून आपल्या कलागुणांचे उत्कृष्ट प्रदर्शन केले.

स्पर्धेत राजविर साळवे यांनी प्रथम क्रमांक पटकावला, त्यांना ₹५,००१ चे पारितोषिक स्व. प्रभाकरराव वाळेकर व श्री. रविभाऊ वासेकर यांच्या सहकार्याने प्रदान करण्यात आले. द्वितीय क्रमांक डिम्पल तरारे (₹३,००१ – श्री. नितीन भाऊ हर्षे), तृतीय क्रमांक अद्वय नैताम (₹२,००१ – स्व. प्रभाकरराव खडसे व श्री. प्रविणभाऊ खडसे), चतुर्थ क्रमांक विनित मेश्राम (₹१,५०१ – स्व. वसंतराव धकाते व श्री. दिलीप धकाते) तर पाचवा क्रमांक प्रथम मेश्राम (₹१,५०१ – स्व. विठ्ठलराव साळवे व श्री. हेमंत साळवे) यांनी पटकावला. विजेत्यांना स्व. बळीरामजी धकाते यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उदय धकाते यांच्याकडून स्मृतीचिन्ह देण्यात आले.

याशिवाय सार्थक मेश्राम, अधिरा कोडाप, दिव्यानी सोनटक्के, तारिश बोदलकर, वीर महेश नेताम, मृदूल विकल्प मसराम, रियांश कुंदोजवार, हर्षल बारसागडे आणि नतीक्षा इखार या नऊ बालगोपालांना उत्कृष्ट सहभागाबद्दल प्रोत्साहनपर पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button