गडचिरोलीविदर्भ

बिरसा मुंडा चौक गोकुळनगर येथे २८ वर्षांची परंपरा जपत तान्हा पोळा उत्साहात साजरा; शिव मंदिर कमिटीचा स्तुत्य उपक्रम

बिरसा मुंडा चौक गोकुळनगर येथे २८ वर्षांची परंपरा जपत तान्हा पोळा उत्साहात साजरा; शिव मंदिर कमिटीचा स्तुत्य उपक्रम

गडचिरोली, दि १२ सप्टें : भगवान बिरसा मुंडा चौक, गोकुळनगर येथे गेल्या २८ वर्षांपासून चालत आलेली तान्हा पोळ्याची परंपरा यंदाही अत्यंत उत्साहात आणि आनंदात साजरी करण्यात आली. शिव मंदिर कमिटी, गोकुळनगर यांच्या वतीने आयोजित या पारंपरिक सोहळ्यात परिसरातील बालगोपालांनी मोठ्या संख्येने भाग घेऊन सणाचा आनंद द्विगुणित केला.

या वेळी लहान मुलांनी आपल्या लाडक्या नंदी बैलांना आकर्षक पद्धतीने सजवून आणले होते. पारंपरिक संस्कृती आणि शेतकरी जीवनाची ओळख करून देणाऱ्या या उत्सवामुळे गोकुळनगर परिसरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. सहभागी झालेल्या सर्व बालगोपालांचा उत्साह वाढवण्यासाठी शिव मंदिर कमिटीतर्फे उत्कृष्ट सजावट आणि सहभागाबद्दल आकर्षक पारितोषिके देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अमोल कुळमेथे, संजय मेश्राम, अजय कुकडकर, स्वप्निल लेनगुरे, प्रफुल कोडापे, करण ढोरे, धीरज भोयर, हरीश कामीडवार, प्रशिक जांभुळकर, उद्धव रोहणकर, संजय उईके, अमोल कुकडकर, सुभेदार अंबादे, गणेश हरडे, संतोष भांडेकर यांच्यासह परिसरातील नागरिकांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button