गडचिरोलीविदर्भ

सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त बेझलवार महाविद्यालयात चर्चासत्राचे आयोजन

अहेरी : भारताच्या पहिल्या स्त्री शिक्षिका व स्त्रीवादाच्या जननी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची 193 वी जयंती 3 जानेवारी रोजी साजरी करण्यात आली. त्यानिमित्त ‘लैंगिक समानता’ या विषयावर चर्चासत्र व निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली. स्त्री पुरुष समानतेची मूलभूत तत्वे रुजविण्याकरिता महाविद्यालयातील एन.एस.एस. विभाग व महिला कक्षाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालय स्त्री पुरुष एकता व त्याविषयी सव्वेदनशिलता जागृत करण्याकरिता अनेक उपक्रमांचे आयोजन केले जाते. त्याचाच एक भाग म्हणून सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचीत्य साधून प्राचार्य डॉ. विजय सोमकुवर यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने अनेक यशस्वी स्त्रियांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी डॉ. रवींद्र हजारे, प्रा. गजानन जंगमवार, प्रा. चंद्रशेखर गौरकर तसेच प्रा. मंगला बनसोड आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. चर्चासत्राकरिता प्रमुख वक्त्या म्हणून प्रा. प्रतिमा सूर्यवंशी आर.डी. महाविद्यालय, नागेपल्ली उपस्थित होत्या. त्यांनी स्त्री पुरुष समानतेची बीजे कुटुंबातून रुजविली जावी असे विचार मांडले. कार्यक्रमाच्या वेळी लैंगिक सव्वेदनशिलता निर्माण करण्याकरिता विविध उपक्रमांची घोषणा करण्यात आली.

कार्यक्रमाचे संचालन प्रा. प्रतिभा जवादे यांनी, प्रास्ताविक डॉ. रूपा घोनमोडे तर आभार डॉ. सोनाली वाघ यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता एनएसएस विभाग व महिला विभाग यांनी परिश्रम घेतले. सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अरविंद पोरेड्डीवार व सचिव प्रशांत पोटदुखे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास सुमारे 50 विद्यार्थी व 15 शिक्षक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button