गडचिरोलीविदर्भ

अंघोळीसाठी गेलेल्या युवकाचा नदीत बुडून मृत्यू

कढोली येथील घटना

कुरखेडा : तालुक्यातील कढोली गावालगत वाहणाऱ्या सती नदीत मित्रांसोबत आंघोळीला गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना १३ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजताच्या दरम्यान घडली. विशाल ताराचंद सहारे (वय २१) रा. कढोली असे मृत युवकाचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, कढोली येथील ५ युवक गावालगत वाहत असलेल्या सती नदीत आंघोळीसाठी गेले होते. मित्रासोबत नदीत आंघोळीकरिता पाण्यात उतरलेल्या विशालला पाण्याचा अंदाज न आल्याने तो खोल पाण्यात उतरला. नदीला पाणी जास्त असल्याने तो बुडाला. त्याच्या सोबत असलेल्या युवकांनी त्याला वाचविण्यासाठी आरडाओरड केली. परंतु वेळेवर कुठलीच मदत मिळाली नाही. गावातील युवक नदीच्या पाण्यात बुडाल ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरताच गावातील लोकांनी नदी पात्राकडे धाव घेत गावातील भोई समाजाच्या मदतीने पाण्यात बुडालेल्या युवकाचा शोध घेतला असता युवक बुडालेल्या ठिकाणापासून ५० मीटर अंतरावर मिळून आला. पाण्यातून काढण्यात उशीर झाल्याने युवक मयत झाल्याने पोलिस विभागाला सूचना करण्यात आली. प्रकरण आरमोरी पोलिस स्टेशनच्या हद्दीत येत असल्याने आकस्मिक मृत्यूची नोंद करत शव उत्तरीय तपासणीकरिता आरमोरी येथे पाठविण्यात आले आहे.

घटनेची माहिती कळताच कुरखेडा येथील तहसील कार्यालतील आपत्ती व्यवस्थापन चमूने तहसीलदार कुरखेडा यांच्या नेतृत्वात घटना स्थळाकडे धाव घेत मदत कार्य केले. आरमोरी पोलिस घटनेचा पुढील तपास करीत आहे.

मृत युवकाच्या पश्चात दोन भाऊ व आई असा परिवार आहे. तरुण वयात मुलाचे अवेळी निधन झाल्याने परिवारावर मोठे संकट कोसळले आहे. मृत युवकाच्या परिवारास तत्काळ शासनाकडून आर्थिक मदत करावी अशी मागणी केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button