महाराष्ट्रमुंबई

विशाळगड प्रकरण : धार्मिक सलोख्याचे वातावरण बिघडवणाऱ्यांवर कारवाई करा – प्यारे खान यांची मागणी

कोल्हापूर : येथील विशाळगड आणि गजापुर मधल्या कथित अतिक्रमणा विरोधात आंदोलन करण्याच्या निमित्ताने धार्मिक तेढ निर्माण करून वातावरण बिघडवणाऱ्या लोकांच्या विरोधात सक्त कारवाई करण्याची मागणी अल्पसंख्याक आयोगाचे राज्य अध्यक्ष प्यारे जिया खान यांनी केली आहे. जमावाच्या हल्ल्याने येथे काही दिवसांपूर्वी कायदा व सुव्यवस्था निर्माण झाली होती. त्याचे लोण राज्यभरात पसरू नयेत व प्रगतीवादी महाराष्ट्रात असलेला एकोपा अबाधित रहावा या उद्देशाने प्यारे खान यांनी तातडीने भेट दिल्यामुळे दोन्ही समाजात समाधान पाहायला मिळते.

प्यारे खान यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांची भेट घेऊन विशाळगड प्रकरणासंदर्भात चर्चा केली.

आंदोलनाच्या नावाखाली काही टोळ्या हल्ल्याच्या उद्देशाने आलेल्या होत्या. हेतुपुरस्सर वातावरण बिघडवणाऱ्या अशा लोकांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी प्यारे खान यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button