क्राईमभंडाराविदर्भ

१८ किलो गांजासह २१ लाखांचा मुद्देमाल जप्त

कारधा पोलिसांची कारवाई

भंडारा : जवळील कारधा चौकात महामार्गावर १२ जुलै रोजी सकाळी ९ वाजता नाकाबंदी दरम्यान कारधा पोलीसांनी कोंबड्यांच्या चाराच्या बोरीमध्ये लपवून गांजा तस्करी करणाऱ्या ट्रकवर कारवाई केली. पोलीसांनी १८ किलो ४५० ग्रॅम गांज्यासह २१ लाख २७ हजार २७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करून ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

कारधा पोलीस महामार्गावर कारधा चौकात वाहनांची तपासणी करतांना नाकाबंदी दरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीवरुन ट्रक क्र. सीजी ०४ जेडी ५२६७ या ट्रकला थांबवून झडती घेतली असता सदर ट्रकमध्ये कोंबड्यांच्या चाऱ्याच्या प्लास्टिक बोरीमध्ये गांजा लपवून तस्करी करतांना आढळून आले. पोलीसांनी १८ किलो ४५० ग्रॅम गांजा जप्त केला. पोलीसांनी केलेल्या कारवाईत गांजासह २१ लाख २७ हजार २७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीसांनी ट्रकचालक शैलेष नारायण मेश्राम (३९) रा. उसरीपार ह. मु. नागपूर याचेविरुद्ध कारधा पोलीसात गुन्हा दाखल केला आहे.

सदर कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक लोहित मतानी, अप्पर पोलीस अधिक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी मनोज सिडाम यांचे मार्गदर्शनात पोनि गणेश पिसाड, पोहवा दिलीप धावडे, त्र्यंबक गायधने, रणधीर डोंगरे, सचिन गभणे, सचिन बावणकुळे, मनिष कनपुरिया, अमोल वाघ, दिपक चौरागडे, प्रमोद आरीकर, आदींनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button