
महसूलमंत्र्यांसमवेत विविध विषयांचा आढावा घेणार; नागरिकांशी संवाद साधणार
गडचिरोली: राज्याचे वित्त व नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधि व न्याय, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल शुक्रवार, १९ सप्टेंबर २०२५ रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते महसूल मंत्र्यांसोबत विविध विकासकामांचा आढावा घेणार असून, नागरिकांच्या निवेदनांचाही स्वीकार करतील.
सकाळी ११.४५ वाजता: गडचिरोली येथे आगमन. दुपारी १२.०० वाजता: जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल मंत्र्यांसमवेत नागरिकांची निवेदने स्वीकारण्यासाठी वेळ राखीव. दुपारी १.३० वाजता: जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल मंत्र्यांसमवेत विविध विषयांच्या आढावा बैठकीला उपस्थिती. सायं. ५.०० वाजता: पत्रकार परिषद. सायं. ५.३० ते ७.०० वाजता: शासकीय विश्रामगृह येथे राखीव. सायं. ७.०० ते ८.३० वाजता: महसूल मंत्र्यांसमवेत विविध ठिकाणी सदिच्छा भेटी. रात्री गडचिरोली येथे मुक्काम.



