गडचिरोलीविदर्भ

उदय धकाते यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षकेत्तर पुरस्कार प्रदान

गडचिरोली : यावर्षीचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षकेतर पुरस्कार चांदा शिक्षण मंडळ चंद्रपूर संचालित वसंत विद्यालय, गडचिरोली येथील मुख्य लिपिक उदय बळीराम धकाते यांना प्रदान करण्यात आला.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांचे महामंडळातर्फे प्रतीवर्षी राज्यातील शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या बांधवांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षकेतर कर्मचारी म्हणून हा सर्वोच्च मानाचा हा पुरस्कार देण्यात येतो. यावर्षी राज्यस्तरीय गुणवंत शिक्षकेतर पुरस्कारासाठी चांदा शिक्षण मंडळ, चंद्रपूर द्वारा संचालित वसंत विद्यालय, गडचिरोली येथील मुख्य लिपिक उदय बळीराम धकाते यांची निवड करण्यात आली. शिक्षकेत्तर कर्मचारी मधून या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी प्रथमच गडचिरोली जिल्ह्यातील एका शिक्षकेत्तर कर्मचाऱ्याची निवड झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्राला हा प्रथमच मानाचा बहुमान उदय धकाते यांच्यारूपाने मिळाला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटना महामंडळाचे ५२ वे राज्यस्तरीय अधिवेशन व चर्चासत्र रविवार १९ जानेवारी रोजी शहिद बालाजी सभागृह, पिंपळनेरी रोड, चिमूर येथे आयोजित करण्यात आले होते. राज्यस्तरीय अधिवेशनात आमदार अभिजित वंजारी उपस्थित होते.

या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटना महामंडळाचे अध्यक्ष अनिल माने, सरकार्यवाह शिवाजीराव खांडेकर, कार्याध्यक्ष मोरेश्वर वासेकर, उपाध्यक्ष प्रिया पवार, रविंद्र गवळी, खैरुद्दीन सय्यद, सरीता कुलकर्णी, देविदास पंडागळे, डॉ. गोवर्धन पांडुळे, गजानन नानचे, संजय कावळे, राजेश्वर चापुले, श्रीधर गोंधळी, डी.पी. महाले, डॉ. विजय ताले, सुखदेव कंद, रामचंद्र केळकर, गणपत बागडी, आप्पासाहेब खराडे-सांगली, चंद्रकांत जोशी रत्नागिरी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

राज्यस्तरीय गुणवंत शिक्षकेत्तर पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल गडचिरोली जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा शिक्षकेत्तर सेवक संघाचे जिल्हाध्यक्ष अशोक काचिनवार, कार्याध्यक्ष संदीप भरणे, उपाध्यक्ष संघमित्रा वाळके, उपाध्यक्ष नंदलाल लाडे, शैलेश कापकर, कोषाध्यक्ष अभिजित शिवणकर, प्रमोद येलमुले, अरुण धोडरे, भूपेश वैरागडे, हेमंत रामटेके, बंडू शिवणकर, घनश्याम नैताम, डोमळे, मडावी, आदींनी उदय धकाते यांचे अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button