
धानोऱ्यात जिल्हाध्यक्ष योगिता पिपरे यांच्या नेतृत्वात निदर्शने
धानोरा : भाजप महिला आघाडी, गडचिरोलीने काँग्रेस पक्षाच्या विरोधात जोरदार निदर्शने करत निषेध नोंदवला. काँग्रेस नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातेवर केलेल्या अपमानास्पद टिप्पणीच्या निषेधार्थ धानोरा येथील बाजार चौकात भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष योगिता पिपरे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.
राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात कॉंग्रेसची विचारधारा ही कायम समाजात विष पेरणारी व नारीशक्तीचा अपमान करणारी राहिली आहे.पंतप्रधान पद हे देशाचे असतात आणि त्यांचा आई विषयी बोलताना अपशब्द वापरणे, इतकेच नाही तर वाईट पद्धतीने चित्र रेखाटने हा देशातील समस्त मातृशक्तिचा अपमान आहे आणि देशातील मातृशक्ति ही कॉंग्रेसचे विष कधीही सहन करणार नाही. बिहार निवडणुकीचा मुद्दा पुढे करून विष पेरून मातृशक्तीचा अपमान व अनादर करणार्या कॉंग्रेस पक्षाचा भाजप महिला आघाडीच्या वतीने जाहीर निषेध करतो, असे भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष योगिता पिपरे म्हणाल्या.
या निषेध आंदोलनात भाजप महिला आघाडीच्या प्रदेश सचिव रेखा डोळस, जिल्हा महामंत्री अर्चना बोरकुटे, जिल्हा उपाध्यक्ष कविता उरकुडे, जिल्हा सचिव अर्चना चन्नावार, तालुकाध्यक्ष भुमाला परचाके, रोशनी बानमारे, वर्षा कन्नाके यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.



