
गोंदिया : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 अंतर्गत मतदानाची टक्केवारी वाढविण्याकरीता व कोणीही मतदानापासून वंचित राहू नये यासाठी निवडणूक आयोगाने 85 वर्षावरील वयोवृध्द मतदार व दिव्यांग मतदारांना गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करुन दिलेली आहे. गोंदिया जिल्ह्यातील 63-अर्जुनी मोरगाव, 64-तिरोडा, 65-गोंदिया व 66-आमगाव या चारही विधानसभा मतदारसंघात झालेल्या गृह मतदानामध्ये 85 वर्षावरील असलेले वयोवृध्द मतदार आणि दिव्यांग मतदारांनी गृह मतदानाचा लाभ घेत लोकशाहीच्या पर्वात मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला आहे.
जिल्ह्यातील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय तथा तालुका निवडणूक कार्यालयाद्वारे निर्धारित केलेले पथकाने 85 वर्षावरील वयोवृध्द मतदारांना व दिव्यांग मतदारांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष त्यांचे मतदान घेऊन गृह मतदानाची प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडली.



