गडचिरोलीविदर्भ

सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल जिल्ह्याच्या दौऱ्यावर ; विकासकामांचा घेणार आढावा

गडचिरोली : राज्याचे वित्त व नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधि व न्याय, कामगार राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल हे १५ मे रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यामध्ये ते विकासकामांचा आढावा घेणार असून, नुकसानग्रस्त भागांना भेट देणार आहेत.

ॲड. जयस्वाल यांच्या दौऱ्याची सुरुवात आरमोरी येथून होणार आहे. दुपारी १ वाजता त्यांचे आरमोरी येथे आगमन होईल. त्यानंतर ते अमृत योजना २.० अंतर्गत आरमोरी शहर पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजन कार्यक्रमात सहभागी होतील. दुपारी २ वाजता ते आरमोरी तालुक्यातील मौजा मानापूर येथे भेट देणार आहेत. या ठिकाणी जंगली हत्तींमुळे झालेल्या नुकसानीची ते पाहणी करून बाधित गावकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

मानापूर येथील पाहणीनंतर, दुपारी २.३० वाजता ॲड. जयस्वाल गडचिरोलीकडे रवाना होतील. दुपारी ३ वाजता त्यांचे जिल्हा नियोजन भवन, गडचिरोली येथे आगमन होईल. येथे ते जिल्हास्तरीय खरीप आढावा बैठकीस उपस्थित राहून कृषी विभागाच्या तयारीचा आढावा घेतील. सायंकाळी ६ वाजता ॲड. जयस्वाल नियोजन भवनात पत्रकारांशी संवाद साधणार असून, दौऱ्याची माहिती तसेच शासनाच्या योजनांबाबत ते माध्यमांना अवगत करतील. सायंकाळी ६.३० वाजता त्यांचे शासकीय विश्रामगृह येथे आगमन होईल आणि त्यानंतर सायंकाळी ७.३० वाजता ते रामटेककडे प्रस्थान करतील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button