क्राईमभंडाराविदर्भ

जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड ; पाच आरोपींना अटक, पावणेदोन लाखांचा मुद्देमाल जप्त

भंडारा : तालुक्यातील दिघोरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या दहेगाव/माईन्स परिसरातील जंगलात सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ५ जुगारांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून एकूण १ लाख ७७ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

दिघोरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की, दहेगाव माईन्स परिसरातील जंगलात कॅनलच्या कडेला काही इसम मोठ्या प्रमाणावर जुगार खेळत आहेत. माहिती मिळताच विलंब न करता शिंदे यांनी आपल्या पथकासह जंगलात सापळा रचला आणि अचानक धाड टाकली. यावेळी आरोपी पळण्याच्या बेतात असतानाच पोलिसांनी त्यांना रंगेहाथ पकडले.

या छाप्यात पोलिसांनी मावेश रामकृष्ण बोरकर (४८), रा. लाखांदूर, आकाश नरेंद्र टेंभुर्णे (२५), रा. लाखांदूर, गोविंदसिंग हरनामसिंग रामगडे (५८), रा. झिरोबा, ता. लाखांदूर, बलरामसिंग करतांगसिंग बावरी (४२), रा. झिरोबा, ता. लाखांदूर, कमलेश अंबालाल बन्सोड (३८), रा. सावंगी, ता. देसाईगंज, जि. गडचिरोली या पाच आरोपींना अटक केली आहे.

पोलिसांनी घटनास्थळावरून रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य असा एकूण १,७७,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई आचले आणि पोलीस हवालदार मातेरे यांच्या फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १२ अन्वये गुन्हा (अ.क्र. ०५/२०२६) दाखल करण्यात आला आहे.

जंगल परिसर असल्याने या ठिकाणी छुप्या पद्धतीने अवैध व्यवसाय सुरू होते. मात्र, दिघोरी पोलिसांनी वेळीच ही कारवाई केल्याने अवैध धंदे चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे आणि त्यांच्या पथकाच्या या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास दिघोरी पोलीस करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button