गोंदियामुख्य बातमीविदर्भ

पूरग्रस्त भागाची पाहणी करतेवेळी नेत्यांची अनोखी स्टंटबाजी

खासदार चढले कारच्या बोनेटवर तर आमदार ट्रॅक्टरच्या फावड्यात ; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

गोंदिया : गोंदिया-भंडारा जिल्ह्यात 9 व 10 सप्टेंबर रोजी आलेल्या पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी काँग्रेस पक्षाचे खा. डॉ. प्रशांत पडोळे यांनी चक्क आपल्या कारच्या बोनेट वर बसून हात हालवीत, स्मित हास्य करीत, पूरग्रस्त, नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला, दरम्यान त्यांनी त्याची रील बनवून स्वतःच्या फेसबुक पेजवर पोस्ट केली हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरलझाला आहे.

आता आमदार साहेब कसे मागे राहणार यात गोंदियाच्या तिरोडा विधानसभा क्षेत्राचे भारतीय जनता पक्षाचे आमदार विजय राहांगडाले यांनी तर चक्क ट्रॅक्टरच्या फावड्यात आपल्या मित्रांसोबत बसून आपल्या मतदार संघात, पूरग्रस्त, नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे.

आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून अनेकांचे घरे पडली, दुःखाच्या या काळात आमदार व खासदार नुकसानग्रस्त भागाची पाहणी करताना आपल्या भावना, संवेदना खिशात ठेवून फिरतात का? असा सवाल देखील या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. आमदार व खासदार रिलचा फिल घेतानाचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button