गडचिरोलीविदर्भ

गावात दारूविक्री नको ; येचलीवासियांकडून प्रयत्न सुरु

भामरागड : तालुक्यातील अतिदुर्गम भागात वसलेल्या येचली गावातील ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांनी अवैध दारूविक्री बंद व्हावी, याकरिता प्रयत्न सुरु केले आहे. नुकतेच गावात मुक्तिपथ चमूच्या उपस्थितीत बैठक घेऊन अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली आहे.

येचली येथे जवळपास १०० घरांची वस्ती आहे. गावात दारू विक्री असल्याने काही प्रमाणात दुष्परिणाम गावात बघावयास मिळतात. नुकतेच मुक्तिपथ व ग्रामस्थांनी मिळून मन्नेराजाराम या गावाला अवैध दारूविक्रीमूक्त केले. या उपक्रमात येचली येथील ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी देखील सहभाग घेतला होता. यातून आदर्श घेत येचली येथील पदाधिकाऱ्यांनी हा प्रयोग आपल्याही गावात करून व्यसनमुक्त गाव निर्माण करण्याचे ठरविले आहे. याकरिता गावातील लोकांना जागृत करण्यासाठी मुक्तिपथ टीमला पाचारण करण्यात आले. त्याअनुषंगाने ग्रापं सरपंच, उपसरपंच व पोलिस पाटील यांच्या उपस्थितीत विशेष बैठक पार पडली. यावेळी मुक्तिपथ तालुका संघटिका निळा किन्नाके यांनी लोकांना दारूमुळे गाव विकासावर होणारे परिणाम पटवून दिले. दारूबंदी कायद्याची माहिती दिली. अवैध दारूविरोधात ग्रामपंचायत व ग्रामसभेला असलेले अधिकार व कार्य समजावून सांगितले. दारूविक्री थांबल्याशिवाय विकास शक्य नाही, याकरिता ग्रामस्थानी एकोप्याने लढा देऊन मन्नेराजाराम गावाप्रमाणे दारूविक्रीमुक्त गाव निर्माण करण्याचे आवाहन किंनाके यांनी केले. यावेळी गाव पोलो ठेवून गावातील दारु हद्दपार करण्याचे ठरविण्यात आले. दरम्यान मुक्तीपथ शक्तीपथ स्री संघटना बैठक घेऊन आरोग्य, कमजोरी आणी मलेरीया जनजागृती करण्यात आली.

यावेळी सरपंच कमल कुरचाम, उपसरपंच संजय येजुरवार, पोलीस पाटील सोमय्या येजुरवार, युवक मंडळ अध्यक्ष वैभव पुजलवार, उपसंघटक भूपेंद्र सडमेक यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button