गडचिरोलीविदर्भ

इंदिरानगर व शहराच्या विकासासाठी सदैव कटीबद्ध – माजी नगरसेवक प्रमोद पिपरे यांचे प्रतिपादन

गडचिरोली : नवदुर्गा उत्सव मंडळ व बाल गणेश मंडळ इंदिरानगर यांचे सौजन्याने खास मंडई निमीत्याने मौजा इंदिरानगर येथे इंदिरा गांधी न.प. प्राथमिक शाळेच्या बाजुला आकर परिसरात बंद शामियानात धनंजय स्मृती रंगभुमी वडसा प्रस्तृत ‘बाळा! मीच तुझी आई रे’ या नाट्यप्रयोगाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते.

नाटकाचे उद्घाटन भाजपचे लोकसभा समन्वयक तथा माजी नगरसेवक प्रमोद पिपरे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी होते. प्रमुख पाहुणे म्हणून भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रमेश मुरसे, भाजपचे जिल्हा सचिव अनिल कुनघाडकर, सामाजिक कार्यकर्ते संजय मांडवगडे, अ‍ॅड. बाळासाहेब आखाडे, गणेश कुनघाडकर, सागर सातपुते, गजानन नैताम, संदिप दुधबळे, देवानंद खोब्रागडे, देवराव बुरांडे, शुभम भरडकर, जयदेव नैताम, चंदाबाई बुरांडे, आदे, प्रकाश भांडेकर, संजय पिपरे, चंद्रकांत भोयर, नरेश खोबे, पोलिस पाटील भाष्कर कोठारे, स्वप्नील मडावी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

नाटकाचे आयोजन मंडळाचे अध्यक्ष पंकज नैताम, उपाध्यक्ष कैलाश भांडेकर, सचिव महेश कुकुडकार, शुभम भांडेकर, अमित भांडेकर, नितीन बुरांडे, अनिल नैताम, राज बोबाटे, प्रकाश माहिष्कार, मनोज जवादे, सदानंद सुरनकर, सतिश शेंडे, शोएब पठाण, शुभम गिरसावळे यांच्या सहकार्याने उत्कृष्टरित्या पार पडले.

उद्घाटनाप्रसंगी मार्गदर्शन करताना माजी नगरसेवक प्रमोद पिपरे यांनी सांगितले की, इंदिरानगर वॉर्ड हा भाजपाने वसविला असुन या वार्डाच्या विकासासाठी अनेक विकासकामे केलेली आहेत. वॉर्डात शाळेचे बांधकाम, पिण्याच्या पाण्याची टाकी, पाईपलाईन, रस्ते, नाल्या तसेच इलेक्ट्रीक पोल उभारले. याशिवाय वॉर्डातील तरूण युवक, नागरिक व महिलांना विविध योजनांचा लाभ मिळवून दिला. मुद्रा लोनच्या माध्यमातुन फुटपाथ दुकानदार व छोट्या व्यवसायिकांना उद्योग उभारण्यासाठी कर्ज उपलब्ध करून दिले. याचा फायदा इतरही युवकांनी घ्यावा. कामगार कल्याण कार्यालयातुन अनेक मजुरांना फायदा मिळालेला आहे. इतरही मजुर व कामगारांनी कामगार नोंदणी करून कामगारांच्या योजनांचा लाभ घ्यावा असेही ते म्हणाले.

लाडकी बहीण योजनेचा लाभ वॉर्डातील अनेक महिलांना मिळालेला आहे. नगर परिषदेकडुन कमी व्याज दरात अनेक महिला बचत गटांनी कज घेवून रोजगार सुरू करून फायदा घेतलेला आह. ज्या बचत गटांना आवश्यकता आहे, त्यांनी नगर परिषदेकडे अर्ज करून योजनेचा फायदा घ्यावा. तसेच आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड काढुन नागरिकांनी आरोग्य योजनेचा फायदा घ्यावा. असेही प्रमोद पिपरे यांनी सांगीतले. तसेच गडचिरोली शहरात 131 कोटींची नळयोजना कामाची निविदा निघाली असुन इंदिरानगर तसेच गडचिरोली शहरातील सर्व वॉर्डात दोन वेळेस स्वच्छ पाण्याच्या पुरवठा होणार आहे, असेही प्रमोद पिपरे यांनी यावेळी सांगीतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button