भंडाराविदर्भ

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे शनिवारी भंडारा जिल्हा दौऱ्यावर: जनतेसोबत साधणार संवाद

भंडारा : राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे शनिवार, २६ जुलै रोजी भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते नागरिकांच्या विविध प्रश्नांवर आणि समस्यांवर थेट जनसंवाद साधणार आहेत.

महसूलमंत्री बावनकुळे यांच्या उपस्थितीत महसूल विभागाच्या कामकाजाचा विस्तृत आढावा घेतला जाईल. दुपारी १२ वाजता: जिल्हाधिकारी कार्यालयात उपविभागीय अधिकारी आणि अपर जिल्हाधिकारी यांच्या कामाचा आढावा. दुपारी १:३० वाजता: जिल्ह्यातील मुद्रांक शुल्क व नोंदणी विभागाचा आढावा, त्यानंतर भूमी अभिलेख विभागाच्या कामकाजाचा आढावा. दुपारी ३ वाजता: स्थानिक आमदार महोदयांसोबत बैठक. दुपारी ४ वाजता: नियोजन सभागृहात पत्रकार परिषद. सायंकाळी ५ वाजता: त्याच ठिकाणी जनतेसोबत ‘जनसंवाद’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

या दौऱ्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना महसूलमंत्र्यांसमोर थेट आपल्या समस्या मांडण्याची संधी मिळणार आहे. निवासी उपजिल्हाधिकारी लीना फलके यांनी ही माहिती दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button