गडचिरोलीमहाराष्ट्रमुंबईविदर्भ

गडचिरोलीतील निकृष्ट आणि अनियमित तांदूळ पुरवठा करणाऱ्यांवर कठोर कारवाई – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई : गडचिरोली जिल्ह्यात अनियमित आणि निकृष्ट दर्जाच्या तांदूळ पुरवठ्याबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असून, यासंदर्भात अहवाल मागवून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सांगितले.

विधानसभा सदस्य नाना पटोले आणि सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, या प्रकरणाचा सविस्तर अहवाल मागवून दोषींवर तातडीने दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तसेच, लोकप्रतिनिधी आणि संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेवून  तांदळाच्या पुरवठा प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणली जाईल. आवश्यकता भासल्यास या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक (SIT) नेमले जाईल आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button