गडचिरोलीमुख्य बातमीविदर्भ

जिल्हाभरात 481 मुक्तिपथ-शक्तीपथ संघटना गठीत ; 25628 महिला सदस्य सहभागी

महिलांच्या सक्षमीकरणासाठी शक्तिपथ संघटना कार्यरत

गडचिरोली : महिलांच्या आरोग्य विषयक समस्ये विषयी महिलांना ज्ञान मिळावे, चर्चा घडून यावी, महिलांना एकत्र येवून संवाद करता यावा. विचार, भावना व्यक्त करता याव्या, सांस्कृतिक कार्यक्रम करता यावे, मुक्तिपथ संघटनेतील महिला अधिक सक्षम व्हाव्या, गावाची दारूबंदी टिकून राहावी इत्यादी विविध हेतूने मुक्तिपथ गाव संघटने अंतर्गत महिलांच्या मुक्तिपथ-शक्तीपथ संघटना गावातील महिलांच्या सहभागातून स्थापन करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत जिल्हाभरात 481 शक्तिपथ संघटना गठीत करण्यात आल्या असून 25628 महिला या संघटनेच्या सदस्य झाल्या आहेत.

मुक्तिपथ गाव संघटनेअंतर्गत गावात बैठक घेऊन शक्तिपथ संघटना गठीत करण्यात आल्या आहे. याअंतर्गत गावात महिलांच्या बैठकी होऊन महिलांमध्ये असलेली आरोग्यविषयक कमजोरी, खर्रा खाण्याचे दुष्परिणाम, खर्राचे व्यसन कसे कमी करावे, गर्भवती व स्तनदा माताना खर्रापासून पासून दूर कसे ठेवावे, अवैध दारूविक्रीविरोधात कृती कशी करता येईल, संघटना मजबूत कशी करावी, कोणत्या कृती गावात करू शकतो, सक्रीय महिलांची यादी, इत्यादी मुद्द्यावर महिलांमध्ये संवाद होऊन महिला, एकत्र येत आहेत, संघटित झाल्या आहे. या निमित्ताने गावात अवैधरित्या सुरु असलेल्या दारू विरोधात संघर्ष करण्यासाठी महिलांच्या संघटना मजबूत झाल्या आहे. अवैध दारूविक्रेत्याना नोटिस, सामूहिक गाव स्वच्छता, दारू बंद असलेल्या गावात विजय स्तंभ, दारू पिणार्‍या व्यक्तिकरिता व्यसन उपचार शिबीराचे आयोजन, हळदी कुंकू कार्यक्रम कमजोर महिलांसाठी आरोग्य शिक्षण व औषध देणे, इत्यादि विविध कृती मुक्तिपथ तालुका चमूच्या मदतीने गावात केल्या जात आहेत.

आतापर्यंत देसाईगंज तालुक्यात 45 कार्यक्रम घेण्यात आले असून 2988 महिलांनी सहभाग दर्शविला. आरमोरी 40 कार्यक्रमामध्ये 1934, कुरखेडा तालुक्यात घेण्यात आलेल्या 45 कार्यक्रमामध्ये 3175, कोरची 42 कार्यक्रमात 1550 महिलांची उपस्थिती, धानोरा तालुक्यातील 43 कार्यक्रमामध्ये 2035 तसेच गडचिरोली तालुक्यात 41 कार्यक्रम  पार पडले तर 2146 महिला सहभागी झाल्या होत्या. चामोर्शी तालुक्यात घेण्यात आलेल्या 49 कार्यक्रमात 3270 महिलांची उपस्थिती होती. मुलचेरा 42 कार्यक्रमात 1987, एटापल्ली 44 कार्यक्रमामध्ये 2499 महिलांचा सहभाग, भामरागड 10 कार्यक्रमात 475, अहेरी तालुक्यातील 34 कार्यक्रमामध्ये 1864 तसेच सिरोंचा तालुक्यात घेण्यात आलेल्या 46 कार्यक्रमामध्ये 1723 महिलांची उपस्थिती होती. आतापर्यंत जिल्हाभरातील बाराही तालुक्यात मुक्तिपथ-शक्तिपथचे 481 कार्यक्रम पार पडले. यामाध्यमातून एकूण 25628 महिलांपर्यंत पोहचून महिलांच्या सक्षमीकरणासाठी शक्तिपथ संघटना कार्यरत असल्याचे दिसून येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button