
माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांची उपस्थिती
अहेरी : स्थानिक राजे धर्मराव विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य एम.के. मंडल यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अहेरी इस्टेटचे राजे, माजी राज्यमंत्री तथा धर्मराव शिक्षण मंडळाचे अध्यक्ष राजे अम्ब्रीशराव आत्राम होते. तर विशेष अतिथी म्हणून धर्मराव शिक्षण मंडळाच्या उपाध्यक्ष राजमाता राणी रुख्मिणी देवी आणि धर्मराव शिक्षण मंडळाचे कोषाध्यक्ष कुमार अवधेशरावबाबा आत्राम हे होते. दीप प्रज्वलीत व विद्येची देवता माता सरस्वती व थोर समाजसेवक यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात अम्ब्रीशराव आत्राम महाराज यांनी सत्कारमूर्ती, सेवानिवृत्त प्राचार्य एम.के. मंडल यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार केला आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी धर्मराव शिक्षण मंडळाचे प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी आणि मंडल कुटूंबातील सदस्य, अहेरीचे प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.



