गडचिरोलीविदर्भ

निवडणुका दारूमुक्त व पारदर्शक करण्यासाठी प्रयत्न करा – तहसीलदार पाटील यांचे विभाग प्रमुखांना निर्देश

मुक्तिपथ मुलचेरा तालुका समितीची बैठक 

गडचिरोली : मुलचेरा तहसील कार्यालयात दारू व तंबाखूमुक्त गडचिरोली जिल्हा विकास कार्यक्रम अंतर्गत तालुका समितीची बैठक तहसीलदार चेतन पाटील यांच्या अध्यक्षतेत पार पडली. यावेळी आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका दारूमुक्त व पारदर्शक करण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश सर्व विभाग प्रमुखांना तहसीलदार पाटील यांनी दिले.

सभेला परी.तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी शशिकांत जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विनोद म्हशाखेत्री, वैद्यकीय अधीक्षक डॉ. स्मिता साळवे, पोलिस उपनिरीक्षक ऋतुजा खापे, रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. स्वपन बाछाड, उमेद BMM रवींद्र मोहुर्ले, महसुल सहाय्यक जल्लेवार, लेखापाल रवींद्र कानंदे, ता.आ. सहा. मिसार, वि.अ. आरोग्य चिचघरे, NCD समुपदेशक प्रफुल पाल, मुक्तिपथ तालुका संघटक रुपेश अंबादे उपस्थित होते.

यावेळी सर्व शासकीय विभागाच्या १०० यार्ड परिसरातील पानठेले कायम बंद करण्यासह किराणा दुकानातून तंबाखूजन्य पदार्थ विक्री बंद करणे. गाव व शहरातील दारू विक्रेत्यांवर कारवाई करून विक्री बंद करणे. प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर दारू व तंबाखूमुक्तीसाठी स्थापन केलेल्या ग्रामपंचायत समिती कृतिशील करावे. ग्रामपंचायतद्वारा गाव संघटनेला मान्यता देण्यात यावी. शहरातील तंबाखूजन्य पदार्थ विक्रेत्यांवर तालुका पथकाद्वारे कारवाई करावी. वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या क्षेत्रातील अवैध हातभट्टीवर कायदेशीर कारवाई करावी. वर्ग ५ ते १२ करिता ११ निकषानुसार कृती कार्यक्रम राबवून तंबाखू व दारूमुक्त शाळा, महाविद्यालय करावे. उमेद अभियाना अंतर्गत दारू व तंबाखू नियंत्रणाकरिता गाव स्तरावर महिलांना सहकार्य करावे. आशा कार्यकर्ता यांनी स्तनदा व गरोदर मातांना आपल्या मुलांना कँसर पासून वाचवा याबाबत जनजागृती कार्यक्रम करणे. प्राथमिक आरोग्य केंद्रात येणाऱ्या दारू व्यसनी रुग्णांना मुक्तिपथ तालुका क्लिनिकला रेफर करणे यासह विविध मुद्द्यांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button