क्राईमचंद्रपूरविदर्भ

‘एमडी’ ड्रग्जची तस्करी करणाऱ्या युवकाला अटक

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ; १ लाख ३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

चंद्रपूर: रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेने ‘एमडी’ नावाच्या अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या एका युवकाला अटक केली आहे. त्याच्याकडून ६.६ ग्रॅम एमडी ड्रग्ज आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, ज्याची एकूण किंमत १ लाख ३ हजार रुपये आहे.

पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की, सरकारनगर परिसरात एमडी ड्रग्जची वाहतूक केली जात आहे. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एमएच ३४ बीएन ०७५२ या दुचाकीला थांबवून तपासणी केली. या तपासणीत हा अमली पदार्थ आढळून आला.या प्रकरणी सौरभ दुर्वास कसारे (वय २४, रा. मेजर गेट, वैद्यनगर, चंद्रपूर) या आरोपीला अटक करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून चंद्रपूरमध्ये एमडी बाळगणाऱ्या तरुणांची संख्या वाढली आहे, त्यामुळे हा अमली पदार्थ शहरात कुठून येतो, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. यामध्ये बलराम झाडोकार, सर्वेश बेलसरे, नितीन साळवे, नितीन कुरेकार, दीपक डोंगरे, प्रमोद कोटनाके आणि अमोल सावे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button