गडचिरोलीविदर्भ

जिल्ह्यातील विद्युत समस्या तातडीने मार्गी लावा – खा. डॉ. नामदेव किरसान यांचे निर्देश

महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक  

गडचिरोली : खासदार तथा संसदीय ऊर्जा कमिटीचे सदस्य डॉ.नामदेव किरसान यांनी गडचिरोलीत महावितरणच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्ह्यातील विद्युत विभागातील स्थानिक पातळीवर सुटू शकणाऱ्या विविध समस्या तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

अनेक वर्षांपासून डिमांड भरलेल्या शेतकऱ्यांना कृषीपंपाकरीता विद्युत मीटर उपलब्ध करून देणे किंवा सोलर पंप बसविण्यास इच्छुक शेतकऱ्यांना तातडीने सोलर पंप उपलब्ध करून देणे, वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा नियमीत व सुरळीत करण्यात यावा, अतिरिक्त लोडशेडींग करू नये, शासनस्तरावरून राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ जास्तीत जास्त लाभार्थ्यांना मिळवून देणे यासारख्या अनेक विषयांवर या बैठकीत सकारात्मक चर्चा करण्यात आली.

बैठकीत महावितरणचे अधीक्षक अभियंता प्रकाश खांडेकर, कार्यकारी अभियंता संजय डोंगरवार यांच्यासह इतर कनिष्ठ अधिकारी, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव विश्वजित कोवासे, शहर अध्यक्ष सतीश विधाते, जिल्हा सचिव सुनील चडगुलवार, काँग्रेस नेते हरबाजी मोरे, अनुसूचित जाती सेलचे अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, परिवहन सेलचे अध्यक्ष रुपेश टिकले, श्रेयस बेहरे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button