
आमगाव : देवरी विधानसभा निवडणूक अनुषंगाने भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार माजी आ. संजय पुराम यांच्या प्रचारार्थ आमदार तथा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. देवराव होळी यांनी राष्ट्रवादी (अ. प.) गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत सवांद साधला.
यावेळी राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते नरेश माहेश्वरी, टिकाराम मेंढे, सुरेश हर्षे, कमल बहेकार, रवी क्षीरसागर, चुन्नीलाल सहारे, गिरी महाराज, विनोद कन्नमावर, लोकनाथ खेडे, रमण डेकाटे, प्रमोद शिवणकर, महेंद्र रहांगडाले, सीमा शेंडे, आशिष माहेश्वरी, पंकज पनपालिया, कविता रहांगडाले, येवलकर जियालाल पंधरे उपस्थित होते.



