गोंदियाविदर्भ

पालकमंत्री बाबासाहेब पाटील गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर

गोंदिया : राज्याचे सहकार मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री बाबासाहेब पाटील हे 25 व 26 जानेवारी 2025 रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

25 जानेवारीला सकाळी 8 वाजता नागपूर येथून गोंदियाकडे मोटारीने प्रयाण. सकाळी 10 वाजता सडक अर्जुनी येथे आगमन व आमदार राजकुमार बडोले यांच्या निवासस्थानी भेट. सकाळी 11 वाजता सडक अर्जुनी येथून गोंदियाकडे प्रयाण. दुपारी 12 वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन. दुपारी 12.20 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण. दुपारी 12.30 वाजता जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस उपस्थिती. दुपारी 2.30 वाजता शासकीय विश्रामगृह येथे राखीव. दुपारी 3.45 वाजता रेलटोली, पाल चौककडे प्रयाण. दुपारी 4 वाजता गोंदिया येथील स्थानिक कार्यक्रमास उपस्थित राहतील. सायंकाळी 5.30 वाजता शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. सायंकाळी 5.45 वाजता शासकीय विश्रामगृह गोंदिया येथे आगमन व राखीव.

26 जानेवारीला सकाळी 8.45 वाजता शासकीय विश्रामगृह गोंदिया येथून पोलीस मुख्यालय कारंजाकडे प्रयाण करतील. सकाळी 9.12 वाजता पोलीस मुख्यालय कारंजा येथे आगमन. सकाळी 9.15 वाजता ‘राष्ट्रध्वजारोहण’ समारंभास उपस्थित राहतील. सकाळी 10 वाजता शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण व राखीव. दुपारी 12.30 वाजता शासकीय विश्रामगृह गोंदिया येथून बिरसी विमानतळाकडे मोटारीने प्रयाण. दुपारी 1 वाजता बिरसी विमानतळ येथे आगमन. दुपारी 2.10 वाजता राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ शमशाबाद, हैद्राबाद कडे विमानाने प्रयाण करतील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button