
कामकाजाविषयी घेतली माहिती ; नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडविण्याचे दिले आदेश
भामरागड : आ. धर्मरावबाबा आत्राम यांनी २४ डिसेंबर रोजी तहसील कार्यालय भामरागड येथे भेट देऊन तहसील कार्यालयात सुरु असलेल्या कामकाजा विषयी माहिती घेतली व तहसील कार्यालयात कामकाजाकरिता आलेल्या लोकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व अधिकाऱ्यांना त्या समस्या लवकरात-लवकर सोडविण्याचे आदेश दिले.
यावेळी तहसीलदार किशोर बागडे, आदिवासी सेवक डॉ. चरणजित सिंग सलुजा, माजी पंस सदस्य हर्षवर्धनबाबा आत्राम, तालुकाध्यक्ष रमेश मारगोनवार, तसेच अन्य पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.



