गडचिरोलीविदर्भ

चाकलपेठ-मार्कंडा व मार्कंडा रोड-शंकरपूर हेटी-सावरहेटी रस्ता बांधकामाची चौकशी करा

चामोर्शी येथील जनता तक्रार दरबारात केली होती गावकऱ्यांनी तक्रार

माजी आ. डॉ. देवराव होळी यांना ग्रामस्थांचे निवेदन

चामोर्शी : मागील सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असताना एकूण 49 किलोमीटरची कामे माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या प्रयत्नातून मंजूर करण्यात आली होती. त्यामध्ये चाकलपेठ मार्कंडा रस्ता व मार्कंडा रोड ते शंकरपूर हेटी-सावरहेटी मार्कंडा रोडला जोडणारा रस्ता या कामांचा समावेश होता. सदर काम चांगल्या प्रकारे व्हावे याकरिता गावकऱ्यांनी कंत्राटदाराला सूचना केल्या होत्या. मात्र कंत्राटदराने कोणत्याही गावकऱ्यांना विश्वासात न घेता त्याकडे पूर्णता दुर्लक्ष करून निकृष्ट दर्जाचे बांधकाम सुरू केले. त्यामुळे या संदर्भात चामोर्शी येथील जनता तक्रार दरबारात माजी आमदार डॉ. देवराव होळी यांचेकडे तक्रार केली. गावकऱ्यांच्या तक्रारीवरून संबंधित कत्राटदारांना कामाचा दर्जा सुधारण्याबाबत निर्देश दिले होते. मात्र तरीही कंत्राटदाराने निकृष्ट दर्जाचे बांधकाम करीतच असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे सदर रस्ता बांधकामाची चौकशी करण्यात यावी. दोषींवर कारवाई करावी व कामाचा दर्जा सुधारण्यात यावा अशी मागणी माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्याकडे गावकऱ्यांनी निवेदनाच्या माध्यमातून केली.

निवेदन देताना शहर महामंत्री विलास चरडूके, माजी नगरसेवक विजय गेडाम, पूर्णानंद व्याहडकर, भाजपा जिल्हा सचिव साईनाथ बुरांडे, जिल्हा सचिव दिलीप चलाख, नारायण भाकरे, प्रतीक राठी, बंडू साखरे, आत्माराम रोहनकर, धोडरे, हिचमी, लालजी राऊत व गावकरी उपस्थित होते.

सदर बांधकाम गावकऱ्यांना विश्वासात घेऊन न केल्यास काम बंद पाळण्यात येईल असा इशारा यावेळी माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी प्रशासनाला दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button