गडचिरोलीविदर्भ

जिनिंग व प्रेसिंग नसल्याने सिरोंचातील कापसाची तेलंगणात विक्री

जिनिंग व प्रेसिंग उभारणीसाठी महसूलची जागा उपलब्ध करावी – सभापती सतीश गंजीवार

सिरोंचा : तालुक्यात सिंचनाची सोय असल्यामुळे खरीप हंगामात धान आणि मिरचीसह कापूस पिकाचे उत्पादन घेतले जाते. मात्र, तालुक्यात एकही जिनिंग व प्रेसिंग नसल्याने शेतकऱ्यांना तेलंगणा राज्यात कापसाची विक्री करावी लागते. त्यामुळे येथे जिनिंग व प्रेसिंग उभारणीसाठी महसूलची जागा उपलब्ध करावी, अशी मागणी सिरोंचा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सतीश गंजीवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून केली आहे.

सिरोंचा तालुक्यातील शेतकऱ्यांना तेलंगणा राज्यातील वारंगल, चेन्नूर, भोपालपल्ली, मंचेरियाल आदी ठिकाणी कापूस विक्रीसाठी न्यावा लागतो. यात त्यांना अनेकदा कमी भाव दिला जातो. सध्या ६ हजार ३०० रुपये प्रतिक्विंटल भाव दिला जात आहे. तालुक्यातील ब्राह्मणपल्ली चेक येथील सर्व्हे १६७/१ आबादी जमीन जिनिंगसाठी योग्य आहे. त्यामुळे या जागेवर जिनिंग उभारावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.

सिरोंचा तालुक्यात एकही जिनिंग व प्रेसिंग नसल्यामुळे तेलंगणा राज्यातील खासगी व्यापारी सिरोंचा तालुक्यात येऊन शेतकऱ्यांकडून कमी भावात कापूस खरेदी करतात. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते. वाहतुकीच्या साधनांअभावी शेतकरी कमी दरात कापूस विकतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button