गडचिरोलीविदर्भ

गोंडवाना सैनिकी विद्यालयात सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी

गडचिरोली : गोंडवाना सैनिकी माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालय गडचिरोली येथे सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून व दीप प्रज्वलित करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य ओमप्रकाश संग्रामे हे होते तर अतिथी म्हणून पर्यवेक्षक अजय वानखेडे हे होते. सुभाषचंद्र बोस हे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील प्रमुख नेत्यांपैकी एक होते. त्यांना प्रेमाने आणि आदराने नेताजी म्हणून संबोधले जाते शिवाय सुभाषचंद्र बोस हे धैर्य, त्याग आणि देशभक्तीचे एक उत्तम उदाहरण आहेत. ते अभ्यासात सुद्धा हुशार होते म्हणून त्यांनी भारतीय नागरी सेवा परीक्षा सुद्धा उत्तीर्ण केली होती, परंतु ब्रिटिश सरकारची सेवा करण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिला.

दुसऱ्या महायुद्धादरम्यान, जपान आणि जर्मनीच्या मदतीने त्यांनी स्वतः “आझाद हिंद फौज” ची स्थापना केली. आणि स्वतंत्र लढ्याकरिता मोलाचे योगदान दिले. त्यांच्या या कार्यामुळे त्यांचे आदर्श आजच्या युवा पिढीने नेहमीच ठेवायला पाहिजे, असे मत उपप्राचार्य ओमप्रकाश संग्रामे यांनी मांडले. प्रसंगी पर्यवेक्षक अजय वानखेडे व विद्यार्थ्यांनी सुद्धा नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाला विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button