
नर्सिंग कॉलेजच्या द्वितीय वर्षाचा ८८.८८ टक्के निकाल
आरमोरी : येथील श्री साई स्कूल ऑफ नर्सिंग कॉलेजच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी ऑक्टोबर २०२४ ला परीक्षा दिली होती. महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ नर्सिंग आणि पॅरामेडिकल एज्युकेशन मुंबई यांनी निकाल जाहीर केला. यामध्ये श्री साई स्कूल ऑफ नर्सिंग कॉलेज आरमोरीचा निकाल ८८.८८ टक्के लागला.
या कॉलेजमधून एकूण ३६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ३२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये ६ विद्यार्थ्यांनी प्रावीण्य प्राप्त केले, तसेच १७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. प्रथम क्रमांक स्वाती संतोष सेलोटे हिने ८४.७१ टक्के गुण प्राप्त केले, तसेच द्वितीय क्रमांक योगिता नानाजी बगमारे हिने ८३.४२ टक्के गुण, तर तृतीय क्रमांक मिळवत दीपाली नानाजी करांकर हिने ८२.४२ टक्के गुण प्राप्त केले.
प्रावीण्य श्रेणीत आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये स्वाती सेलोटे, योगिता बगमारे, दीपाली करंकर, निशिगंधा औत्तकर, चांदणी गोंगले, आचल मंडलवार यांचा समावेश आहे. सर्व उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष तथा कॉलेजचे कॉलेज संचालक सुधाकर साळवे यांनी कौतुक केले. विद्यार्थ्यांनी यशाचे श्रेय कॉलेजचे संचालक सुधाकर साळवे, प्राचार्या पूनम नारनवरे, मृणाल दर्वे, पल्लवी कोथळकर, संगम मेश्राम, चंदू दुमाने, करिश्मा हांडे, मोनाली सडमेक, समीर कांबळे व कॉलेजचे प्रशासकीय अधिकारी भूषण ठकार, चंदा गुरनुले यांना दिले. या महाविद्यालयाने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम जोपासली आहे.



