गडचिरोलीविदर्भ

उपसरपंच अर्चना बोरकुटे यांचा वाढदिवस शाळेतील विद्यार्थ्यांसोबत साजरा

गडचिरोली : साखरा गावातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत उपसरपंच अर्चना बोरकुटे यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांच्या उत्साहात साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम केवळ एक वाढदिवस सोहळा नसून, सामाजिक भावना आणि शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करणारा एक अनोखा उपक्रम ठरला.

या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी अर्चना बोरकुटे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. विद्यार्थ्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्यानंतर त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून आपला आनंद त्यांच्यासोबत साजरा केला. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून बोरकुटे यांनीही समाधान व्यक्त केले.

कार्यक्रमाला उपस्थित राहताना अर्चना बोरकुटे म्हणाल्या की, विद्यार्थ्यांमध्ये आनंद निर्माण होईल असा प्रत्येक क्षण साजरा करण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो. समाजाच्या उभारणीसाठी शिक्षण हा महत्त्वाचा दुवा असून, विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करणे आपले कर्तव्य आहे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी केंद्रप्रमुख मुलकलवार, मुख्याध्यापक राजेन्द्र घुगरे, बाल कल्याण समितीचे सदस्य दिनेश बोरकुटे, ग्रामपंचायत सदस्य दिनेश चौधरी, आणि जयमाला मेश्राम यांच्यासह शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेखा गडपल्लीवार यांनी केले, तर आभार संगीड़वार यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button