
सिंदेवाही : कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाही येथे पोक्रा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा -२ च्या अंतर्गत जागतिक बँकच्या अधिकाऱ्यांच्या क्षेत्रीय दौरा पार पडला. यावेळी पोक्रा प्रकल्प, जागतिक बँक आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला, कृषी विज्ञान केंद्र, सिंदेवाही, कृषी विभाग चंद्रपूर आणि विभागीय कृषी संशोधन केंद्र सिंदेवाही येथील विविध अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते..
या दौऱ्यादरम्यान संपूर्ण चमूचे संचालन पोखरा प्रकल्पाचे संचालक परिमल सिंग यांनी केले. त्यांच्यासमावेत प्रमुख नेतृत्व रंजन समांतराय यांनी केले. दौऱ्याकरिता आलेल्या अधिकाऱ्यांच्या चमूमध्ये वनामती संचालक डॉ. मिताली शेट्टी, कृषी सहसंचालक एस.एम. तोटावार, मृदा विज्ञान विशेषज्ञ विजय कोळेकर, कृषी विशेषज्ञ सौम्या श्रीवास्तव, तनुज माथूर, वरून सिंग, सामाजिक विकास विशेषज्ञ दिव्या लाड, जलसंपदा सल्लागार शेखर मुहू, पर्यावरण विशेषज्ञ वनिता कोम्मु, नरेश कुमार सुरा, आकांक्षिता डे, विद्यासागर फडके, राजुल पंत, सागर कातकडे, विकास कुनुंगो आदी उपस्थित होते. कृषी विद्यापीठ आणि कृषी विभाग यांच्यासोबत चर्चेनंतर त्यांनी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाही यांनी दत्तक घेतलेले आदर्श गाव नाचनबट्टी येथील शेतकऱ्यांची संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांनी दिलेल्या प्रतिसादात मुळे आलेले सर्व अधिकारी कृषी विद्यापीठ कृषी विज्ञान केंद्र, सिंदेवाही आणि कृषी विभाग यांच्या कार्याबद्दल संतुष्ट झाले.



