गडचिरोलीविदर्भ

226 उमेदवारांनी दिले दारूमुक्त निवडणूकीचे वचननामे

गडचिरोली : गडचिरोली, वडसा व आरमोरी नगरपरिषद निवडणूक दारूमुक्त व्हावी यासाठी 226 नगरसेवक उमेदवार व नगराध्यक्ष पदाच्या 15 उमेदवारांनी ही निवडणूक दारूमुक्त करणार असे वचन दिले आहे. उर्वरित उमेदवाराचे वचननामे घेणे सुरू आहे. जिल्ह्यातील गडचिरोली, आरमोरी व वडसा या तीन तालुक्यात होत असलेली नगरपरिषद निवडणुक दारूमुक्त व्हावी, यासाठी मुक्तिपथ अभियानातर्फे उमेदवाराकडून दारूमुक्त निवडणुकीचे वचननामे व मतदाता जागृती सभा घेणे सुरू आहे. जाणीवजागृती अंतर्गत  शहरातील विवीध ठिकाणी बॅनर लावून, पोस्टर चिपकवून व वार्डातील नागरिकांच्या सभा स्वीप व मुक्तिपथद्वारा घेऊन चर्चा करून जनजागृती केली जात आहे. दारूमुक्त निवडणूक व्हावी यासाठी वार्डाचे ठराव घेतले जात आहे. निवडणुकी करिता उभे असलेल्या उमेदवारांकडुन दारूमुक्त निवडणूक करण्याचा वचननामा लिखित व रेकोर्डेड पद्धतीने घेतल्या जात आहेत.

निवडणुकीमध्ये उभे होणारे उमेदवार दारूचे व्यसनी नसावे. निवडणुकी दरम्यान दारूचे वाटप होऊ नये. दारूविक्री बंदी टिकून राहावी. दारूच्या नशेत मतदान केल्यास अयोग्य उमेदवार निवडला जातो. अशा व्यक्तीच्या हातात शहराचा कारभार दिल्यास विकासाला ब्रेक लागेल. यामुळे निवडणूक दारूमुक्त होणे गरजेचे आहे. या उद्देशाने वार्ड संघटना व शहरवासीयांच्या पुढाकाराने दारूमुक्त नगर परिषद निवडणूक करण्यासाठी ठराव घेणे सुरु आहे. विविध शहरांतील वार्डांमध्ये बॅनर लावून जनजागृती केली जात आहे.

लोकसभा, विधानसभा, निवडणुकीप्रमाणेच नगरपरिषद निवडणूक सुद्धा दारूमुक्त करण्यासाठी प्रशासन व शहरवासीयांच्या सहकार्याने मुक्तिपथ अभियानाद्वारे हे उपक्रम सुरू आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये तिन्ही विधानसभा मतदार संघातील प्रमुख राजकीय व अपक्ष उमेदवारांनी मतदारांना दारूचे प्रलोभन देणार नाही आणि दारूचा वापर करणार नाही असा वचननामा लिहून दिला होता. यापूर्वी लोकसभा निवडणुकीतही दारू वितरित करण्याचे प्रमाण अत्यंत कमी झाले होते. ग्रामपंचायत निवडणूक सुद्धा दारूमुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्यात आला होता. विविध गावांनी या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद दिला होता. त्याचप्रकारे यंदाची नगर परिषद निवडणूक सुद्धा दारूमुक्त करण्यासाठी विविध वार्डांमध्ये ठराव घेऊन प्रयत्न केल्या जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button