गडचिरोलीविदर्भ

महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात एमआयएम पक्षाचे निषेध आंदोलन

‘लाईट बिलाची होळी’ करून निषेध आंदोलन करण्यात येणार ; समीर साजिद बिल्डर यांच्या दौऱ्याची तयारी आणि संघटनात्मक बैठक

गडचिरोली : महावितरण कंपनीकडून ग्राहकांना येणाऱ्या भरमसाठ वीज बिलांविरोधात आणि होणारी ग्राहकांची लूट थांबवण्यासाठी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. याचाच एक भाग म्हणून, मंगळवार, २४ जून रोजी एमआयएम पक्षाच्या नेतृत्वात ‘लाईट बिलाची होळी’ करून निषेध आंदोलन करण्यात येणार आहे.

एमआयएम पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव समीर साजिद बिल्डर साहेब यांच्या गडचिरोली दौऱ्याची जय्यत तयारी सुरू आहे. या दौऱ्यादरम्यान जिल्ह्यातील व शहरातील समस्या सोडवणे आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये एमआयएम पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार कसे निवडून आणता येतील, यासह इतर सर्व विषयांवर एमआयएम जिल्हाध्यक्ष बाशिद शेख आणि महिला जिल्हाध्यक्ष आयशा अली सय्यद यांनी ‘ॲक्शन मोड’वर काम करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. ही बैठक उत्साहात पार पडली.

यावेळी युवा आघाडी जिल्हाध्यक्ष दिलीप बांबोळे, सोशल मीडिया प्रमुख जावेद शेख, जिल्हा उपाध्यक्ष विपिन सूर्यवंशी, युवा नेते शहेबाज शेख, जिल्हा महासचिव मुकेश डोंगरे, राकेश वेस्कडे, युवा आघाडी शहर अध्यक्ष मुन्ना रामटेके, ज्येष्ठ नेते सलाम शेख, इरफान सैफी, तेजराम नेतनकर, कोमल राजपूत, दिलीप गटलेवार, महिला जिल्हा कार्याध्यक्ष शगुफ्ता शेख, शोभा शेरकी, सुनंदा जेंगठे, वनिता गटलेवार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button