गडचिरोलीविदर्भ

कारगिल चौक येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

सामाजिक कार्यकर्ते उदय धकाते यांच्या हस्ते ध्वजारोहण ; शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

गडचिरोली : भारतीय लोकशाहीचा उत्सव असलेला ७७ वा प्रजासत्ताक दिन गडचिरोली शहरातील कारगील चौक येथे अत्यंत उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार उदय धकाते यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.

ध्वजारोहण सोहळ्यानंतर स्थानिक श्री गुरुदेव उच्च प्राथमिक शाळा आणि राजीव गांधी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रम सादर केले. विशेषतः राजीव गांधी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर नृत्यांनी उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या या कलाविष्कारामुळे कारगील चौक परिसरात राष्ट्रीय एकात्मतेचे वातावरण निर्माण झाले होते.

या सोहळ्याचे आयोजन कारगील चौक दुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने करण्यात आले होते. याप्रसंगी मंडळाचे उपाध्यक्ष रेवनाथ गोवर्धन, सचिव प्रकाश भांडेकर, संजय गद्देवार, महेंद्र मसराम, रुपेश सलामे, बाळू मोटघरे, महादेव कांबळे, रामा हजारे यांच्यासह सुचिता धकाते, वनिता भांडेकर, संगीता धकाते, दुधे, मुख्याध्यापिका मीरा मडावी, प्रा. सुनीता साळवे, संजय लांजेवार, विजय सुरपाम, साहिल गोवर्धन आणि गणेश मेश्राम प्रामुख्याने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन श्री गुरुदेव उच्च प्राथमिक शाळेचे ज्येष्ठ शिक्षक तुषार निकुरे यांनी केले. या सोहळ्यासाठी कारगील चौक परिसरातील नागरिक, महिला, युवक आणि शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हा सोहळा शहराच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button