
एटापल्ली : सार्वजनिक बांधकाम विश्रामगृह, एटापल्ली येथे ०९ ऑगस्ट रोजी व्हॉईस ऑफ मीडिया तालुका कार्यकारिणी गठीत करण्यात आली. जुन्या कार्यकारिणीची कार्यकाळ संपुष्टात आल्याने व नविन कार्यकारणी गठीत करण्याची आवश्यकता असल्याने लोकशाही पद्धतीने निवड प्रक्रिया पार पाडण्यात आली. अध्यक्षपदी शेषराव संगीडवार तर उपाध्यक्षपदी जनार्धन नल्लावार यांची निवड करण्यात आली आहे.
अध्यक्षपदाच्या निवडीकरिता बैठकीत चर्चा करण्यात आली. अध्यक्ष पदाकरिता शशांक नामेवार यांनी शेषराव संगीडवार यांचे नाव सुचविले व या नावाला महेंद्र सुल्वावार यांनी अनुमोदन दिले. कार्याध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, कोषाध्यक्ष पदाकरिता अशाच पध्दतीने प्रक्रिया पार पडली.
यामध्ये कार्याध्यक्षपदी आनंद बिस्वास, उपाध्यक्ष म्हणून जनार्धन नल्लावार, सचिव प्रशांत मंडल, सहसचिव राकेश तेलकुंटलवार, कोषाध्यक्ष तनुज बल्लेवार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. अशाप्रकारे तालुका पत्रकार संघटनेची कार्यकारणी गठीत करण्यात आली व त्याप्रमाणे ठराव बुकात ठराव पारित करण्यात आले आहे.
यात सदस्य म्हणून रविंद्र रामगुंडेवार, विनोद चौहान, मणिकंठ गादेवार, महेंद्र सुल्वावार, तेजस गुज्जलवार, व्ही.आर. जांभुळकर, शैलेश आकुलवार, शशांक नामेवार, गजानन खापने, पावन कल्याण गोमासे, पार्थ माड़वी यांची निवड करण्यात आली.



