गडचिरोलीविदर्भ

मालेवाड्यात रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; माजी आ. कृष्णा गजबे यांच्या हस्ते उद्घाटन

कुरखेडा : “रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे,” हा संदेश पुन्हा एकदा मालेवाड्यात अधोरेखित झाला. संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन (दिल्ली) आणि प्राथमिक आरोग्य केंद्र, मालेवाडा यांच्या वतीने २० ऑगस्ट रोजी आयोजित रक्तदान शिबिराला तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिराचे उद्घाटन माजी आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते फीत कापून झाले.

उद्घाटनप्रसंगी बोलताना माजी आमदार कृष्णा गजबे यांनी रक्ताचे महत्त्व पटवून दिले. ते म्हणाले, “आज समाजात आजारपण आणि अपघातांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत रक्ताची खूप गरज भासते. रक्तदान करून आपण एखाद्याचा जीव वाचवू शकतो. म्हणून, रक्तदान हे मानवी जीवनातील सर्वात मोठे दान आहे.” त्यांनी निरंकारी बाबा हरदेवसिंगजी महाराज यांचा संदेश आठवून दिला, “रक्त नाड्यांमध्ये वाहिले पाहिजे, नाल्यांमध्ये नाही.”

या शिबिराला भाजपचे माजी जिल्हा अध्यक्ष किशन नागदेवे, भाजपचे ज्येष्ठ नेते माधवदा निरंकारी, हरिश निरंकारी, प्रभारी पीएसआय नायक वाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य गीता कुंभरे, सरपंच अनुसया पेंदाम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

शिबिरात रक्तदान करणाऱ्या सर्व दात्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. संत निरंकारी सेवादलाच्या पुरुष आणि महिला कार्यकर्त्यांनी शिबिराचे संपूर्ण व्यवस्थापन यशस्वीपणे सांभाळले. या माध्यमातून ‘रक्तदान केल्याने नातेसंबंध वाढतात आणि माणुसकी जिवंत राहते,’ असा संदेश देण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button