क्राईमचंद्रपूरविदर्भ

‘सीडीसीसी’ बँक प्रकरण ; सायबर हल्लेखोरांनी काढले ६२ लाख रुपये

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींपर्यंत पोहोचण्याची आशा  

चंद्रपूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवरील सायबर हल्ल्यात तब्बल तीन कोटी ७० लाख रुपये उडविले. या प्रकरणात पोलिसांना अपेक्षित यश आले नसले तरी दिल्ली, नोएडा फरिदाबाद, हरियाणा, दिल्ली, पंजाब, नोएडा, गुडगाव येथील विविध खात्यांत वळती केल्याची बाब उघड झाली आहे. या रकमेपैकी सायबर हल्लेखोरांनी ६२ लाख रुपये खात्यांमधून काढून घेतल्याचे तपासात समोर आले आहे. ज्या एटीएममधून, बँकेतून रकमेची उचल केली त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज मागितले आहे. हे सीसीटीव्ही फुटेजच या प्रकरणाचा महत्त्वाचा धागा ठरण्याची पोलिसांना आशा आहे.

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत आरटीजीएस व एनएफटी करण्यासाठी ७ व १० फेब्रुवारीला आलेले तीन कोटी ७० लाख ६४ हजार ७४२ रुपये सायबर हल्लेखोरांनी उडवून विविध खात्यात वळती केले. यातील १ कोटी ६० लाख रुपयांची रक्कम परत मिळविण्यात यश आले; परंतु ७ फेब्रुवारीला उडवलेली रक्कम त्या बँक खात्यातून सायबर चोरट्यांनी एटीएमद्वारे काढल्याचे तपासात पुढे आले. याच्या खोलात जाण्यासाठी पोलिसांनी एटीएमचे सीसीटीव्ही फुटेज व त्या खात्याची केवायसी आदीबाबत माहिती हस्तगत करणे सुरू केले आहे. या आधारे हाती ठोस लागेल, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

गाजियाबाद, नोएडा, मेट्रो स्टेशन, इंडियन ओव्हरसिस बैंक, उत्कर्ष बैंक, जम्मू-कश्मीर बैंक, सेंट्रल कॅथलिक सिरीन बैंक येथून खकम काढल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर सायबर चोरटे बँकेची वळती केलेली रक्कम एकापेक्षा अधिक बँक खात्यात सतत वळती करत आहेत. तेसुद्धा खाते गोठवण्यासाठी पोलिस प्रयत्नरत आहेत.

सायबर चोरट्यांनी ज्या बँक खात्यात पैसे वळते केले ती भाड्याची खाते असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त होत आहे. पोलिसांनी ज्यांच्या खात्यात रक्कम वळती करण्यात आली त्याचीही माहिती हस्तगत करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button