भंडाराविदर्भ

भंडारा जिल्हा पोलीसांचा निवडणुक अनुषंगाने तुमसर शहरात फ्लॅग मार्च

भंडारा : विधानसभा सार्वत्रीक निवडणुक २०२४ अनुषंगाने पोलीस अधिक्षक यांचे मार्गदर्शनानुसार निवडणूक प्रक्रीया शांततेत पार पडावी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहावी याकरीता १३ नोव्हेंबर रोजी पोलीस स्टेशन तुमसर अंतर्गत तुमसर शहरात भंडारा पोलीसांच्या वतीने राष्ट्रध्वज, पोलीस ध्वज व बँड पथक सह फ्लॅग मार्च घेण्यात आला. सदर फ्लॅग मार्च तुमसर पोलीस स्टेशन येथून सुरु होवुन बावनकर चौक, संताजी मंगल कार्यालय, तहसील कार्यालय, आंबेडकर चौक, कुंभारे नगर, नांगी चौक, सुभाषबाबु पुतळा, सराफा लाईन, जामा मस्जीद समोरुन बावनकर चौक येवून परत पोलीस स्टेशन तुमसर मेथे येवून समापन करण्यात आला. सदर फ्लॅग मार्च दरम्यान पोलीस वाहनांमधून आदर्श आचार संहीतेचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत तसेच मतदान प्रक्रीया शांततेत पार पाडावी याकरीता जनतेस आवाहन करण्यात आले.

सदर फ्लॅग मार्च मध्ये जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते, पोलीस अधिक्षक नुरुल हसन, अपर पोलीस अधिक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी पांडुरंग गोफणे, तसेच २० पोलीस अधिकारी, ७५ पोलीस अंमलदार, आर.सी.पी. चे ०२ प्लाटून, एस.एस.बी कंपनीचे १५ जवान, आर.ए.सी. चे ६५ जवान, आ.पी.एफ. चे २५ जवान हजर होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button