
नागपूर : 10 जानेवारीला प्रत्येक जिल्ह्य़ात, विधानसभेत “घर चलो अभियान” राबवुन प्रत्येक विधानसभेत 15 हजार भाजपाचे सदस्य करुन घ्या अश्याच प्रकारे 14 जानेवारी, 17 जानेवारी व 20 जानेवारीला विशेष कार्यक्रम राबवुन प्रत्येक विधानसभेने सदस्य नोंदणीचे टार्गेट पुर्ण करा. 12 जानेवारीला शिर्डीत अधिवेशनात येताना 250 सदस्य करुनच अधिवेशनात यावे. भाजपाला विधानसभेत 3 करोड 17 लाख मते मिळाली होती. भाजपाला फक्त 1 करोड 51 लाख महाराष्ट्रात सदस्य करावयाचे आहेत. 50 सदस्य बनवुन सक्रिय सदस्य झाल्याशिवाय लोकप्रतीनिधी व भाजपा पक्षाचा पदाधिकारी होता येणार नाही, हे सर्वानी लक्षात घ्यावे असे आवाहन भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
९ जानेवारीला आयोजित वर्चुअल बैठकीत समारोप करताना बोलत ते होते. यावेळी संघटन पर्व प्रदेश संयोजक रवींद्र चव्हाण, प्रदेश महामंत्री आम. विक्रांत पाटिल, प्रदेश महामंत्री माधवी नाईक यांनीही मार्गदर्शन केले. बैठकीत महाराष्ट्रातुन 475 अपेक्षित पदाधिकारी उपस्थित होते.
विभाग संघटन मंत्री यांनी वर्चुअल बैठक घेऊन 10 जानेवारीच्या “घर चलो अभियान” चे सविस्तर नियोजन करावे अशा सुचना भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यानी दिल्या.



