गोंदियाविदर्भ

मासिक सायकलिंग चॅलेंजमध्ये गोंदियातील 39 सायकलिस्टने घेतला सहभाग

32 सायकलिस्टने पटकविले गोल्ड मेडल

गोंदिया : अमरावती सायकलिंग असोसिएशनद्वारे 1 महिन्याचा सायकलिंग चॅलेंज घेण्यात आला होता. यामध्ये 280 लोकांनी सहभाग घेतला या सायकलिंग चॅलेंजमध्ये प्रत्येक दिवशी 40 किलोमीटर सायकल चालवायचे होते, यामध्ये गोंदिया येथील 39 जणांनी सहभाग घेतला यापैकी 32 सायकलिस्टनी गोल्ड मेडल पटकाविला आहे.

हे संपूर्ण चॅलेंज 1 महिन्याचे असून यामध्ये 1 महिन्यामध्ये 25 दिवस तरी सायकल चालवणे अनिवार्य होते. तर यामध्ये 280 लोकांनी सायकल चालवून हा सायकलिंग चॅलेंज पूर्ण केला. तर 280 सायकलिस्ट पैकी गोंदियातील 3 सायकलिस्ट टॉप 3 मध्ये राहिले. ज्यामध्ये पहिल्या क्रमांकावर निखिल बहेकार, दुसऱ्या क्रमांकावर उदयभान निर्वाण तर तिसरा क्रमांक आशा तिडके यांनी पटकविला. विजेत्यांना अमरावती येथे अमरावती सायकलिंग असोसिएशनद्वारा गोल्ड मेडल देऊन सन्मानित करण्यात आले. गोंदिया येथे सुद्धा लवकरच सायकलींग संडे ग्रुपद्वारा सायकलिंग चॅलेंज घेण्यात येणार आहे.

अमरावती सायकलिंग असोसिएशनची औपचारिक नोंदणी तीन वर्षांपूर्वी झाली होती, मात्र सायकलिंगला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचे प्रयत्न गेल्या ७-८ वर्षांपासून सुरू आहेत. लोक सायकलींगकडे कसे वळणार त्यासाठी त्यांनी सायकलींग रंगोत्सव सुरू केले. ज्यामध्ये सायकलिंग चॅलेंज ठेवण्यात येते. यावर्षी सुध्दा त्यांनी सायकलिंग चॅलेंज ठेवले होते, त्याध्ये २८० सायकलस्वारांनी सहभाग घेतला होता. ज्यामध्ये गोंदियातील सर्वाधिक ४० सायकलस्वारांनी नोंदणी केली होती. या सायकलिंग चॅलेंजमध्ये एकूण 280 सायकलस्वारांनी सहभाग घेतला व त्यांनी आपले लक्ष्य यशस्वीरित्या साध्य केले आणि पदके मिळवली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button