गडचिरोलीमहाराष्ट्रविदर्भ
ताडगाव येथे कृषी केंद्राचे उद्घाटन

गडचिरोली : भामरागड तालुक्यातील ताडगाव येथे २६ जून रोजी तहसीलदार बागडे यांच्या हस्ते कृषी केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र कृषी पुरस्कृत सीताराम मडावी मंचावर उपस्थित होते.
यावेळी तहसीलदार बागडे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, ताडगाव येथे कृषी केंद्र झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांना अहेरी किंवा आलापल्लीला जाण्याची आवश्यकता नाही. वेळेवर प्रत्येकाला कृषी केंद्रातून औषधी मिळतील व वेळ वाचेल. यावेळी शेतकरी बांधव उपस्थित होते.



