गडचिरोलीमुख्य बातमीविदर्भ

‘प्रोजेक्ट उडाण’अंतर्गत फोटोग्राफीचे ३५ व हाऊस वायरींगच्या ३५ प्रशिक्षणार्थ्यांनी घेतले प्रशिक्षण

प्रशिक्षणार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न

गडचिरोली : जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्याच्या उद्देशाने गडचिरोली “पोलीस दादालोरा खिडकी” चे माध्यमातुन, गडचिरोली जिल्हयातील जनतेसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांचे मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील माओवादग्रस्त क्षेत्रातील सुशिक्षीत गरजु बेरोजगार युवक-युवतींकरीता स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने गडचिरोली पोलीस दल प्रोजेक्ट उडाण अंतर्गत व बिओआय आरसेटी गडचिरोली यांचे संयुक्त विद्यमाने इच्छुक युवकांना फोटोग्राफी व हाऊस वायरिंगचे प्रशिक्षण देण्यात आले होते. सदरचे दोन्ही प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांचा निरोप संमारभ कार्यक्रम ३० जुलै रोजी आरसेटी, गडचिरोली येथे पार पडला.

गडचिरोली पोलीस दलाच्या पुढाकाराने फोटोग्राफी प्रशिक्षणामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील ३५ व वायरींग प्रशिक्षणामध्ये ३५ प्रशिक्षणार्थ्यांनी सहभाग घेतला. ०१/०७/२०२४ ते ३०/०७/२०२४ पर्यंत एकुण ३० दिवसाच्या प्रशिक्षणात प्रशिक्षणार्थ्यांना फोटोग्राफी व हाऊस वायरींगचे प्रशिक्षण देण्यात आले. दोन्ही प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन फोटोग्राफी व हाऊस वायरिंग प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांना व्यवसाय सुरु करण्याकरिता शुभेच्छा दिल्या. यावेळी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिता यांनी सांगितले की, कोणत्याही गोष्टीची लहाण्यापासून सुरुवात करुन ती मोठ्यापर्यंत नेण्याचा प्रयत्न करावा. तसेच कौशल्याचा आधार घेऊन आपल्या स्वतःचा विकास साधता येतो आणि ते गडचिरोली पोलीस दलाने तो कौशल्याचा आधार आपल्याला प्रशिक्षणाच्या माध्यमातून दिलेला आहे. यासोबतच स्किींग इन्स्टीट्युटच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या बेसीक ट्रेनिंगचा जास्तीत जास्त युवक-युवतींनी लाभ घेऊन त्याद्वारे नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करुन पुढे आपला विकास साधावा असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रम पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी एलडीएम प्रशांत धोंगडे, आरसेटी संचालक कैलास बोलगमवार, कार्यक्रम समन्वयक हेमंत मेश्राम व पुरुषोत्तम कुनघाडकर हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोस्टे/उपपोस्टे/पोमकेचे सर्व प्रभारी अधिकारी व नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी पोउपनि. धनंजय पाटील व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button