भंडाराविदर्भ

लाडक्या बहिणींच्या अस्मितेसाठी आ. नरेंद्र भोंडेकर यांच्या पाठीशी राहा – वर्षा उसगावकर यांचे आवाहन

आ. नरेंद्र यांच्या प्रचारासाठी उसगावकर यांचा रोडशो

भंडारा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्यातील महायुती सरकारने लाडक्या बहिणींची काळजी घेतली. ती पुढेही घेतली जाणार आहे. या लाडक्या बहिणींच्या अस्मितेसाठी आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या पाठीशी राहा, असे आवाहन चित्रपट अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी केले.

भंडारा विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आमदार नरेंद्र यांच्या प्रचारासाठी उसगावकर यांच्या झालेला रोडशो वेगळीच छाप पाडणारा ठरला. मराठीच्या अस्मितेसाठी लढणाऱ्या तरुण नेतृत्वाला तिसऱ्यांदा विजयी करून विधानसभेत पाठवा, असे आवाहन त्यांनी केले.

नरेंद्र भोंडेकर यांच्या निवडणूक प्रचारासाठी अड्याळ, कोंडा, कोसरा, पहेला या पवनी तालुक्यातील गावांमध्ये वर्षा उसगावकर यांचा बुधवारी रोड शो झाला. यावेळी मोठ्या संख्येने लाडक्या बहिणींची आणि नागरिकांची उपस्थिती होती.

उसगावकर यांच्यासोबत आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या पत्नी डॉ. अश्विनी याही उपस्थित होत्या. या रोडशोवर जेसीबीद्वारा पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी एका वाहनावर आमदार नरेंद्र भोंडेकर व महायुतीतील घटक पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

नरेंद्र भोंडेकरांच्या प्रचारात जनतेचा प्रचंड प्रतिसाद लाभत आहे. एक तरुण आमदार मतदारसंघाच्या विकासासाठी धडपड करीत आहे. त्याच्या या प्रयत्नांना आपणा सर्वांची समर्थ अशी साथ हवी, असे आवाहन यावेळी वर्षा उसगावकर यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button