
५ हजाराची दारू जप्त
एटापल्ली : तालुक्यातील कसनसूर पोलिस स्टेशन अंतर्गत चोखेवाडा येथे पोलीस विभाग व मुक्तिपथने संयुक्त कारवाई करीत 5 हजार रुपये किमतीची देशी दारू जप्त करण्यात आली. याप्रकरणी संबंधित विक्रेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
चोखेवाडा गावात तीन दारूविक्रेते सक्रिय होते. गावात दारू विक्री होत असल्याने व्यसनाचे प्रमाण वाढले होते. गावातून अवैध दारू हद्दपार करण्यासाठी मुक्तीपथ गाव संघटनेच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत. विविध उपक्रमाच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. अशातच गावात अवैध दारू विक्री सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली. प्राप्त माहितीच्या आधारे पोलिस व मुक्तिपथ टीमने संयुक्तरीत्या अहिंसक कृती केली. एका विक्रेत्याच्या घरात अंदाजे ₹5000 किमतीची 42 नग देशी दारू जप्त करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला. या कारवाईमुळे इतर विक्रेत्यांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक कैलास बेले यांच्या नेतृत्वात पोलिस कर्मचारी यांनी केली. यावेळी मुक्तिपथचे तालुका उपसंघटक आकाश भोयर उपस्थित होते.



