गडचिरोलीविदर्भ

कोटमी येथे ४० हजारांची विदेशी दारू जप्त, विक्रेत्यावर गुन्हा दाखल

मुक्तिपथ व पोलीस विभागाची कारवाई

एटापल्ली : तालुक्यातील कोटमी येथे अवैध दारूविक्रीविरुद्ध मुक्तिपथ आणि पोलीस विभागाने संयुक्तपणे ‘अहिंसक कृती’ राबविली. या कारवाईत विठ्ठल पदा नामक विक्रेत्याकडून अंदाजे ४०,००० रुपये किमतीची विदेशी दारू आणि बिअर जप्त करण्यात आली असून, संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोटमी पोलीस मदत केंद्रांतर्गत येणाऱ्या या गावात अवैध दारूविक्री पूर्णपणे बंद करण्यासाठी मुक्तिपथ गाव संघटनेच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. गावात यापूर्वी तीन प्रमुख विक्रेत्यांमार्फत देशी, विदेशी व हातभट्टीची दारू विकली जात होती. मात्र, गाव संघटनेतील महिलांचा आक्रमक पवित्रा आणि पोलीस विभागाच्या वेळोवेळी मिळणाऱ्या सहकार्यामुळे दोन विक्रेत्यांनी आपला अवैध व्यवसाय आधीच बंद केला.उर्वरित एक विक्रेता चोरट्या मार्गाने दारूची विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर, पोलीस आणि मुक्तिपथ चमूने संबंधित विक्रेत्याकडे धाड टाकून तपासणी केली. यावेळी ४० हजार रुपये किमतीची विदेशी दारू जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला.

या  कारवाईत कोटमी पोलीस मदत केंद्राचे पी.एस.आय. मनोज कदम व टीम, मुक्तिपथचे तालुका उपसंघटक आकाश भोयर यांचा सक्रिय सहभाग होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button