गडचिरोलीविदर्भ

मुक्तिपथ ग्रापं समितीच्या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा

गडचिरोली : मुलचेरा तालुक्यातील वेंगनूर ग्रामपंचायत येथे मुक्तिपथच्या माध्यमातून ग्रामपंचायत समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी गावातील दारूबंदी टिकवून ठेवण्याससह मलेरिया आजारापासून स्वतःचे व आपल्या कुटुंबाचे कसे बचाव करता येईल, या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.

यावेळी गावातील दारूबंदी समोर कशी टिकवून ठेवता येईल, जिल्हा परिषद शाळा तंबाखू व खर्रामुक्त करणे, दारू पिणाऱ्या व्यक्तीच्या शरीरावर झालेला वाईट परिणाम, कमजोरी दूर करण्यासाठी व्यसन उपचार गाव-पातळी शिबिराचे आयोजन करणे इत्यादी मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर ग्रामस्थांना एकत्रित करून मलेरिया आजाराची माहिती देण्यात आली. मलेरिया कसा निर्माण होतो, लक्षणे कोणते, मलेरिया झाल्यास काय करावे, मलेरिया होऊ नये याकरिता काय करावे हे पटवून देण्यात आले. शक्तीपथ बैठकीच्या माध्यमातून महिलांना टॉनिकच्या गोळ्या वाटप करून खर्ऱ्याचे दुष्परिणाम सांगण्यात आले.

यावेळी मुक्तीपथ तालुका संघटक रुपेश अंबादे, गाव पाटील सोन्या गावडे, सरपंच नरेंद्र कांदो, सचिव घुगलोत, लिपीक दीपिका गावडे, ग्रामपंचायत सदस्य दिलीप नरोटे, रोजगार सेवक तुळशीराम गोटा, एमपीडब्लू विनोद पदा, स्पार्क कार्यकर्ती पल्लवी तुपसुंदर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button