गडचिरोलीविदर्भ

आलापल्लीत ‘महाशिव १२ ज्योतिर्लिंग महापडी पूजे’चा सोहळा ; अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते विधिवत पूजन

आलापल्ली : महाशिवरात्रीच्या पावन पर्वाचे औचित्य साधून आलापल्ली येथील शिवदत्त अय्यप्पा मंदिरात ‘महाशिव १२ ज्योतिर्लिंग महापडी शिवपूजा’ हा भव्य धार्मिक सोहळा अत्यंत भक्तीमय वातावरणात पार पडला. या मंगल प्रसंगी अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी विधिवत पूजन करून भगवान शंकराचे आशीर्वाद घेतले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या शुभहस्ते महापूजेचा विधी पार पडला. यावेळी त्यांनी आपल्या मतदारसंघातील आणि क्षेत्रातील जनतेच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. “जनतेच्या सर्व समस्या दूर व्हाव्यात आणि सर्वांच्या जीवनात सुख, शांती व समाधान नांदावे,” असे साकडे त्यांनी यावेळी भगवान शंकराच्या चरणी घातले.

पूजेनंतर राजे साहेबांच्या हस्ते उपस्थित हजारो शिवभक्तांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. या सोहळ्याचे खास आकर्षण म्हणजे मंचेरियल येथील प्रसिद्ध ‘काली ग्रुप’ यांचा भक्तीसंगीताचा कार्यक्रम. त्यांच्या सुश्राव्य संगीताने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले होते.

या धार्मिक सोहळ्याला नरहरी शर्मा गुरुस्वामी, श्रीनिवास बिट्टीवार गुरुस्वामी, सुरेश स्वामी रामगिरवार, सुधाकर स्वामी उल्लीवार, संदीप स्वामी झाडे, मुनेश स्वामी आत्राम, तिरुपती स्वामी सप्पीडवार, जमुना स्वामी नैताम, नानय्या येलेश्वराम, अय्यप्पा मंदिर समितीचे सर्व पदाधिकारी, गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि अहेरी परिसरातील हजारो शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमामुळे आलापल्ली परिसरात चैतन्याचे आणि भक्तीचे वातावरण निर्माण झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button