गडचिरोलीविदर्भ

जिल्ह्यात १५ दिवस जमावबंदी

माओवादी स्मारक सभेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय

गडचिरोली : छत्तीसगड राज्यातील अबुझमाड परिसरात नुकत्याच झालेल्या २७ माओवाद्यांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर, माओवादी संघटनांनी ११ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीत ‘स्मारक सभा’ आणि विविध आंदोलनांचे आवाहन केले आहे. यामुळे गडचिरोली जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी जिल्ह्यात १० जुलै रोजी मध्यरात्रीपासून ते २४ जुलैच्या रात्रीपर्यंत जमावबंदी लागू करण्याचे आदेश जारी केले आहेत.

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) व (३) अंतर्गत शस्त्रे, दगड, स्फोटके, भडकाऊ साहित्य बाळगणे, घोषणा देणे, सभा घेणे, पाच किंवा अधिक व्यक्तींनी एकत्र येणे, मिरवणुका काढणे या कृतींवर बंदी घालण्यात आली आहे. या कालावधीत सार्वजनिक ठिकाणी कोणतीही आंदोलनात्मक कृती करायची असल्यास, त्यासाठी प्रशासनाची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक असेल. हा जमावबंदी आदेश गडचिरोली जिल्ह्याच्या संपूर्ण क्षेत्रात लागू राहील, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button