क्राईमचंद्रपूरविदर्भ

कुंटणखाण्यावर पोलिसांची धाड ; तरुणाला अटक, महिलेची सुटका

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

चंद्रपूर : मूल मार्गावरील लोहारा येथील ‘हॉटेल ताडोबा अतिथी इन’ येथे सुरू असलेल्या कुंटणखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पोलिसांनी शुक्रवारी (दि. ३१) धाड टाकून एका महिलेची सुटका केली आहे. याप्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली असून, लकी ऊर्फ लक्ष्मण रामसिंह शर्मा (वय २६, रा. अलवर, राजस्थान) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना, त्यांना हॉटेल ताडोबा अतिथी इन लोहारा येथे लकी नावाचा युवक स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी महिलांना बोलावून वेश्याव्यवसाय चालवत असल्याची माहिती मिळाली. माहितीच्या आधारे पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकला. त्यावेळी आरोपी लकी ऊर्फ लक्ष्मण रामसिंह शर्मा हा हॉटेलमध्ये एका पीडित महिलेकडून वेश्याव्यवसाय करून उपजीविका करत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी आरोपी लकीला जागेवरच अटक केली. त्याच्या विरोधात रामनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३, ४, ५, ७ अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हॉटेलातून एका पीडित महिलेला ताब्यात घेऊन तिची सुटका करण्यात आली.

जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आणि सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी ही कारवाई यशस्वी केली. पोलिसांनी यापुढे असा प्रकार घडल्यास कठोर कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button